राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६८५ रूग्ण बरे झाले, तर ३ हजार ५३० नवीन करोनाबाधित आढळले. याशिवाय, ५२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,१२,७०६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६५,०४,१४७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८२२१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६२,२५,३०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,०४,१४७ (११.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २,९६,१७६ व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत. तर, १ हजार ८७५ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९,६७१ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.