राज्यात आज दिवसभरात ९१२ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ६८६ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, १९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६८,७९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६४ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२४,९८६ झाली आहे. तर, राज्यात आजर्यंत १४०६०२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४०,५२,२१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२४,९८६ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९,८५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ११,९४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.