राज्यात आज दिवसभरात ९६३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ९७२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, २४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,७१,७६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२७,८३८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०६९२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४३,८४,७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२७,८३८ (१०.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,१६,२८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १०२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ११,७३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.