राज्यात आज दिवसभरात ३ हजा ८३६ जण करोनामुक्त झाले असून, २ हजार ५८३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, २८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,४०,७२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.१८ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,२४,४९८ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १३४५४६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७१,६४,४०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,२४,४९८ (११.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७५,७३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज रोजी एकूण ४१,६७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.