Covid 19 : राज्याचा रिकव्हरी रेट ९७ .२६ टक्के ; दिवसभरात २ हजार ८९५ रूग्ण करोनामुक्त

राज्यात आज रोजी एकूण ३७,०४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

corona update
राज्यात आज रोजी एकूण २८,६३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमीकमी होताना दिसत आहे. यावरून करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय, करोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने, राज्याचा रिकव्हरी रेट देखील हळूहळू वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात २ हजार ८९५ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ४३२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ३२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६२,२४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,७६२ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८९०२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८२,८६,०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४१,७६२ (११.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,५७,१४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३७,०४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 state recovery rate 97 26 per cent during the day 2895 patients recovered from the corona msr

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी