Covid 19 : राज्यात दिवसभरात १ हजार ५८४ रूग्ण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.५५ टक्के

१ हजार ३३८ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

maharashtra corona update
file photo

राज्यात आज दिवसभरात १ हजार ५८४ रूग्ण करोमधून बरे झाले असून, १ हजार ३३८ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचबरोबर ३६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४७,०३८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५५ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०९,२९२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १४०१७० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२४,३९,९०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०९,२९२(१०.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६८,३३८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १८,४६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 states healed 1584 patients a day from corona msr

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!