राज्यात आज दिवसभरात १ हजार ९५ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १ हजार ७८ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर, ४८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५३,५८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५९ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१२,९६५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०२७४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२८,४३,७९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१२,९६५ (१०.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९१,४९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १५,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.