सोलापूर : सोलापूर महापालिकेत गेल्या वर्षी उजेडात आलेल्या बांधकाम परवाना घोटाळ्यातील एका उपअभियंत्यासह चौघांविरुद्ध अखेर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. बांधकाम परवाना ऑनलाईन स्वीकारण्याचे बंधन असताना ऑफलाईन पद्धतीने बेकायदेशीर बांधकाम परवाने देऊन महापालिकेची व संबंधित अर्जदारांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता.

झाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी (रा. ए स्केअर अपार्टमेंट, बसवेश्वर नगर, सोलापूर) या उपअभियंत्यासह श्रीकांत बसण्णा खानापुरे व आनंद वसंत क्षीरसागर हे दोघे अवेक्षक आणि शिवशंकर बळवंत घाटे या लिपिकाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे चौघेही जण महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात नेमणुकीस होते. यासंदर्भात बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात हा प्रकार घडला होता.

Senior police inspector arrested while accepting a bribe of three and a half lakhs
पावती न देता दंडवसुली करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Action against cyber thieves by Central Crime Investigation Department Pune print news
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाई; पुण्यासह देशभरात ३२ ठिकाणी छापे, २६ जणांना अटक
devendra fadnavis poster of badlapur encounter
‘बदला पूरा….’ दहिसरमधील फलक हटवले, आमदार मनीषा चौधरी पालिका अधिकाऱ्यांवर संतापल्या
truck out of hole pune, paver block collapse pune,
पुणे : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना
Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
person Absconding arrested, crime branch,
पुणे : खून प्रकरणात सात वर्षे गुंगारा देणारा गजाआड, गुन्हे शाखेची ठाण्यात कारवाई

हेही वाचा – महायुतीमध्ये ‘जनसुराज्य’कडून मिरज, जत मतदारसंघांचा आग्रह

हेही वाचा – सोलापूर : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून

एका मिळकतदाराने स्वतःच्या मिळकतीवर बांधकामासाठी महापालिकेकडे परवाना मागितला असता त्यातून बनावट बांधकाम परवान्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. झाकीर हुसेन नाईकवाडी व इतरांना बांधकाम परवाना मंजूर करण्याचा कायदेशीर अधिकार नव्हता. तसेच बांधकाम परवाना ऑनलाईन पद्धतीने देण्याची पद्धत होती. परंतु नाईकवाडी याच्यासह अवेक्षक खानापुरे, क्षीरसागर आदींनी कायदा हातात घेऊन परस्पर ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवाने मंजूर करण्याची मालिका आरंभली होती. परंतु जेव्हा हे प्रकरण अंगलट येण्याची चाहूल लागताच संबंधित ९६ बांधकाम परवान्यांशी कागदपत्रांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यावेळी बांधकाम परवाना विभागात नगर अभियंता लक्ष्मण चलवादी नावाचा अधिकारी होता. त्याचीही सखोल चौकशी होणे अपेक्षित होते. त्याने याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान, नाईकवाडी व इतर चौघांना सेवेतून निलंबित करण्यात येऊन त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली होती, त्यानंतर विलंबाने का होईना, या चौघाजणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली. बांधकाम परवाना घोटाळा केवळ नाईकवाडी व इतर तिघाजणांपुरता मर्यादित नाही, तर त्यात इतर वरिष्ठांचाही हातभार लागलेला असावा, अशी प्रश्नार्थक चर्चा आजही महापालिका वर्तुळात होत आहे.