भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी या घटनेला शिंदे गट आणि भाजपामधील गँगवॉर असल्याचे म्हटले. तसंच, आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसंच, एकनाथ शिंदेंकडून आपणास कोट्यवधी रुपयांचे येणे बाकी आहे. हे त्यांनी एकदा जाहीर करून सांगावे, असाही आरोप गणपत गायकवाड यांनी केला. यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गणपत गायकवाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्याकरता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचंही ते म्हणाले.

“आज मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत आम्ही गोळीबाराचा विषय मांडला. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप केले आहेत ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यांनी शिंदेंवर व्यक्तीशः आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही आमचं मत फडणवीसांसमोर मांडलं आहे. त्यानुसार, भाजपाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”
CM Eknath Shinde
“…म्हणून त्यांचा टांगा पलटी करावा लागला”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
ahmednagar lok sabha
विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम
Devendra Fadnavis On Raj Thackeray
राज ठाकरे-अमित शाह यांची भेट, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक दोन दिवस वाट पाहा…”

हेही वाचा >> एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढतेय; आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

समन्वय समितीची नियमित बैठक होत असतात. काही कारणामुळे मधल्या काळात बैठका झालेल्या नाहीत. आज, शिंदे, फडणवीस अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नियमित समन्वय समितीच्या बैठक घ्यावात हे ठरवलं जाईल. गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातून येतात त्याचा मी पालकमंत्री आहे. या दीड वर्षांत गणपत गायकवाडांनी हा विषय मांडला नाही. समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांवर त्यांनी पहिल्यांदाच आरोप केला आहे, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

हेही वाचा >> गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे महायुती तुटणार? भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

गणपत गायकवाड यांनी काय आरोप केले होते?

गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी संधान बांधले. ते आता भाजपशी काही दिवसांत अशीच गद्दारी करतील. मिळेल तेवढे खाऊन घेतात आणि पुन्हा विरुद्ध काम करतात, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वृत्ती आहे. एकनाथ शिंदेंकडून आपणास कोटयवधी रुपयांचे येणे बाकी आहे. हे त्यांनी एकदा जाहीर करून सांगावे. राज्य गुन्हेगारांपासून वाचवायचे असेल, महाराष्ट्राचे चांगले करायचे असेल तर पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे. गोळीबारामुळे माझी प्रतिमा लोकांसमोर गुन्हेगार म्हणून जाण्यास मुख्यमंत्री शिंदेच जबाबदार आहेत. माझ्यासमोर माझ्या मुलाला मारले जात असेल तर बाप म्हणून ते नुसते पाहून जगण्यात अर्थ काय आहे. मी जो गोळीबार केला त्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. मी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आहे, असे गायकवाड म्हणाले.