लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा: महिला सक्षमीकरण, केंद्रीय राखीव पोलीस दलात महिलांचे योगदान आणि प्रतिनिधित्व तसेच स्त्री शक्तीचा संदेश देण्यासाठी दिल्ली येथून निघालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १०० धाडसी ‘मर्दानीं’चे उद्या, सोमवारी भंडारा येथे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी कोब्रा बटालियन सज्ज असल्याची माहिती कोब्रा बटालियनचे अधिकारी पंडित इथापे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या १०० महिलांनी रॉयल एनफिल्ड मोटरसायकलवरून इंडिया गेट, नवी दिल्ली ते छत्तीसगडमधील नक्षलांचा बालेकिल्ला जगदलपूर अशी १८४८ किमी बाईक रॅली काढली आहे. दिल्लीमार्गे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रमार्गे छत्तीसगडला १७ दिवसांच्या प्रवासानंतर त्या पोहोचतील. या धाडसी महिला दुचाकीस्वार जगदलपूरला पोहोचल्यानंतर २५ मार्च रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सीआरपीएफच्या ८४ व्या स्थापना दिनानिमित्त परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला दुचाकीस्वार त्यांच्या संपूर्ण प्रवासात शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका आणि बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधतील आणि त्यांना प्रेरणा देतील.

आणखी वाचा- पत्ता नागपूरचा मतदान केंद्र देवरी, लाखांदूरला, तांत्रिक गोंधळाचा मतदानाला फटका

भंडारा येथे त्यांच्या अगमनाप्रित्यार्थ २० ते २२ मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महर्षी विद्या मंदिर शाळेत रॅलीचे स्वागत होईल. त्यानंतर शहरातून लक्ष हॉस्पिटल, वीरांगना राणी दुर्गावती चौक, लायब्ररी चौक अशा मार्गाने ही रॅली पोलीस परेड ग्राऊंडवर पोहोचेल. या कार्यक्रमांमध्ये देशभक्त नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन २०६ कोब्रा बटालियनचे प्रमुख (पिएमजी) लवकुमार यांनी केले आहे. सीआरपीएफच्या महिला बाईकर्सचा हा ताफा २० मार्चला जिल्ह्यातील २०६ कोब्रा बटालियनमध्ये पोहोचेल. शहरातील बाईकर्सचे रॅलीमध्ये जोरदार स्वागत केले जाईल. २१ मार्च रोजी जिल्ह्यातील काही शालेय आणि महाविद्यालयीन मुलींसोबत त्यांचे साहसी अनुभव कथन करतील. यावेळी डॉग शो आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा- अमरावती : सुटीच्या दिवशीही संपकर्त्यांचा जिल्‍हा परिषदेसमोर डेरा; सोमवारी ‘थाली बजाओ आंदोलन’

‘सीआरपीएफमध्ये ६ महिला बटालियन आहे. जम्मू- काश्मीर, पूर्वोत्तर भारत, एलडब्लूई प्रभावित क्षेत्र या सर्व ३ ऑपरेशनल थिएटरमध्ये महिला सेवा देत आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स. दंगलीसारख्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सीआरपीएफच्या सर्व १५ बटालियनमध्ये महिला सक्रिय असल्याची माहिती इथापे यांनी दिली

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crpf 100 brave mardani from delhi in bhandara on monday ksn 82 mrj
First published on: 19-03-2023 at 17:38 IST