मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी.लीट पदवी देत सन्मानित करण्यात आलं आहे. मंगळवारी ( २८ मार्च ) डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्यी दीक्षांत समारोहात त्यांना डी. लीट ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजीही केली.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मुलगा श्रीकांत शिंदे यांनी याच डी. वाय. पाटील संस्थेतूनच एमबीबीएस आणि त्यानंतर एमएस पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याच विद्यापीठाने डी. लीट पदवीने सन्मान केला, ही खूप मोठी गोष्ट आहे. सन्मान करण्यासाठी पात्र आहे, की नाही माहिती नाही. पण, गौरव किंवा सन्मान होत असताना मागचा काळही आठवायचा असतो.”
“कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्याबद्दल मनात जिद्द आणि खंतही होती. मात्र, तीन वर्षापूर्वी बीएची पदवी घेतली. त्यात चांगले गुण मिळवून उत्तीर्णही झालो. अजूनही पुढं शिकायचं आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या वतीने आज मला डी.लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी @maha_governor मा.श्री.रमेश बैस जी यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली. नेरूळच्या डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये रंगलेल्या या सोहळ्यात अत्यंत विनम्रतेने मी माझे मनोगत मांडले. pic.twitter.com/pTIOuJK0Z4
“कुलपती विजय पाटील म्हणाले, तुम्ही आता डॉ. एकनाथ शिंदे होणार. पण, यापूर्वीच मी डॉक्टर झालोय. छोटीमोठी ऑपरेशन करत असतो. समाजात इतके वर्ष काम करतोय. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे,” असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.