शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीच्या मैदानामध्ये घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पक्षात फूट पाडणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना लक्ष्य केलं. मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. मात्र शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘बाप चोरणारी टोळी’ असा उल्लेख केला. यापूर्वीही उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता निवडणुका लढण्याचं आव्हानही केलं आहे. याच टीकेला आता शिंदे गटातील आमदार आणि शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे.

नक्की पाहा >> ‘बाप चोरणारी टोळी’वरुन उद्धव Vs शिंदे: ‘ठेचा खाणाऱ्यांनी ठेचलं’, ‘आपण बापाचा पक्ष…’, ‘…असं आम्ही म्हणायचं का?’; ठाकरेंना प्रत्युत्तर

रायगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बंदरे आणि खानिकर्म मंत्री असणाऱ्या दादा भुसे यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना दादा भुसे यांनी थेट सरकारने पूर्वी जारी केलेल्या अध्यदेशाचा दाखला देत बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष असून त्यांचं नाव वापरण्याचा अधिकार सर्वांना असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच बाळासाहेब हे सर्वांना पित्यासारखेच आहेत, असंही दादा भुसेंनी म्हटलं. इतकचं नाही तर बाळासाहेबांचा फोटो न वापरण्याच्या आव्हानाला उत्तर देताना दादा भुसे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनाच प्रतिआव्हान केलं.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…

नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सर्व शिवसैनिकांना पित्यासमान आहेत. बाळासाहेब हे शिवसैनिकांना बापासारखे आहेत. सरकारने तसा कायदेशीररित्या शासन आदेश काढून राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे ते आम्हा सर्वांच्या पित्यासमान आहेत,” असं दादा भुसे उद्धव ठाकरेंच्या टीकेसंदर्भात म्हणाले. पुढे बोलताना भुसे यांनी थेट माजी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. “देशाचे पिता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं दैवत आहे. मी बोलू इच्छित नाही, पण जर फोटो काढण्याचीच गोष्ट असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जाऊ मग जनताजनार्दन त्याचा योग्य तो निर्णय करेल,” असं भुसे यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> पत्रा चाळ घोटाळा: “शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर…”; संजय राऊतांचं नाव घेत किरीट सोमय्यांचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना आव्हान

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून शिंदे गट आणि ठाकरे गटाने निवडणुका लढवण्यास जनताच योग्य तो निर्णय देईल असं सांगताना भुसेंनी छत्रपतींच्या नावाने ठाकरे गटाचं राजकारण चालत असेल तर बाळासाहेबांच्या नावं आम्हीही वापरु शकतो अशा अर्थाचा युक्तीवाद केला.