कोरनाच्या सावटानंतर बीड जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. हरयाणामधील प्रसिद्ध गायिका सपना चौधरी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन दहीहंडीनिमित्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमध्ये सपना चौधरी यांना पाहण्यासाठी बीडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळाली. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर क्रेन मिळेल त्या ठिकाणी बसून सपनाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र या कार्यक्रमामध्ये दिसलं.

नक्की वाचा >> सह्याद्री उद्योग समुहाकडून विनोद कांबळीला जॉब ऑफर; मराठमोळ्या उद्योजकाने नोकरी ऑफर करताना पगाराचा आकडाही सांगितला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दीप ज्योत ग्रुप’च्या वतीने सपना चौधरीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वांनी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. करोना काळातील निर्बंधांमुळे दोन वर्षाच्या कालावधीनंतर बीडकरांनी दहीहंडीचा अनुभव घेतला आहे. ‘तेरे आखो का ये काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले, बीडकरांनी या गाण्याला दादा दिल्याचं पहायला मिळालं.

याआधीही परळीमध्ये सपना चौधरीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दहीहंडीनिमित्त सपनाने महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव पाहण्याची इच्छा उपस्थितांसमोर बोलून दाखवली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बीडकरांनी तिची ही इच्छा पूर्ण करत मैदानावरच मानवी थर रचले.

एकीकडे तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केलेली असतानाच दुसरीकडे या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर खर्च करुन कार्यक्रम अगदीच जल्लोषात साजरा केल्याने पुढारी शेतकऱ्यांचे दुःख विसरल्याची टीका काहींनी केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेते योगेश क्षीरसागर, भाजपा नेते भगीरथ बियाणी यासह विविध पक्षातील मंडळी सपना चौधरीच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi 2022 celebration sapna choudhary program in beed in presence of shivena and bjp leaders video rno news scsg
First published on: 19-08-2022 at 10:38 IST