वाशीम काल सायंकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, आज १७ मार्च रोजी सायंकाळी वाशीम तालुक्यातील वाई वारला तर मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी शेतशिवारात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. तर काही भागात कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा: ‘देवेंद्र अंकल ऐकाना… माझ्या पप्पांना जुनी पेंशन द्याना’; संपकऱ्यांच्या वाहन रॅलीतील बालकाने वेधले लक्ष
मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी शेत शिवारात जोरदार गारपीट झाली. या वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच इतर पिकांचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गत दोन दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरू असून आज जिल्ह्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने विविध भागातील विविध पुरवठाही खंडित झाला होता. मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी शेत शिवारात अचानक झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील गहू, कांदा, टोमॅटो, लिंबू, तसेच फळबागाचे मोठे नुकसान झाले.