शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंची अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्याच्या मुद्द्यापासून ते नामांतरणापर्यंतच्या मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. उद्धव यांच्या या भाषणावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.

नक्की पाहा >> Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”

उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभा असेल असा शाब्दिक टोला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी यापूर्वीच व्यक्त होता. बुधवारच्या सभेनंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया देताना माजी नजरसेवक संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक असणाऱ्या देशपांडे यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील अनेक मुद्दे हे नळावरील भांडणाप्रमाणे होते असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून उणीधुणी काढल्याचा शाब्दिक चिमटा देशपांडेंनी काढला आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

उद्धव यांच्या भाषणानंतर लगेचच ट्वीटरवरुन “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही,” असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे. दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु असताना दुसरीकडे वांद्रे कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानामधील एकनाथ शिंदेंच्या सभेमध्ये शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे हे शिवसेना सोडून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे, त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे, त्यांना शिव्या देण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले होते असा खळबळजनक दावा केला आहे.

नक्की वाचा >> “बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…”

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

शिवसेना सोडून गेलेल्या छगन भुजबळ आणि नारायण राणेंबद्दलही असाच प्रकार झाल्याचा दावा शेवाळेंनी आपल्या भाषणा केले आहे. मात्र राज यांच्याबद्दलच्या या दाव्यावर मनसेकडून अद्याप प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही.