मुंबई: पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.

मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार, पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. त्यानंतर १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. तर २० जुलै २०२२ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

Home Voting for Elderly and Disabled Voters, Home Voting Facility Initiated, Home Voting nagpur district, lok sabha 2024, lok sabha phase 1, election 2024, election news,
मतदानापूर्वी गृहमतदान, काय आहे ही पध्दत?‘ हे ’ ठरले प्रथम गृह मतदार
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: नाशिक: बागलाण- १३, निफाड- १, सिन्नर- २, येवला- ४, चांदवड- १, देवळा- १३ आणि नांदगाव- ६. धुळे: धुळे- २, साक्री- ४९ आणि शिंदखेडा- १. जळगाव: रावेर- १२, अमळनेर- १, एरंडोल- २, पारोळा- ३ आणि चाळीसगाव- ६. अहमदनगर: अहमदनगर- ३, श्रीगोंदा- २, कर्जत- ३, शेवगाव- १, राहुरी- ३ आणि संगमनेर- ३. पुणे: हवेली- ५, शिरुर- ६, बारामती- २, इंदापूर- ४ आणि पुरंदर- २. सोलापूर: सोलापूर- २, बार्शी- २, अक्कलकोट- ३, मोहोळ- १, माढा- २, करमाळा- ८, पंढरपूर- २, माळशिरस- १ आणि मंगळवेढा- ४. सातारा: कराड- ९ आणि फलटण- १. सांगली: तासगाव- १. औरंगाबाद: औरंगाबाद- १, पैठण- ७, गंगापूर- २, वैजापूर- २, खुलताबाद- १, सिल्लोड- ३, जालना: जालना- ६, परतूर- १, बदनापूर- १९ आणि मंठा- २. बीड: बीड- ३, गेवराई- ५ आणि अंबेजोगाई- ५. लातूर: रेणापूर- ४, देवणी- १ आणि शिरूर अनंतपाळ- १. उस्मानाबाद: तुळजापूर- २, कळंब- १, उमरगा- ५, लोहारा- २ आणि वाशी- १. परभणी: सेलू- ३. बुलढाणा: खामगाव- २ आणि मलकापूर- ३. (एकूण-२७१)