Video: “…म्हणून मी माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव टाकलंय”; भाजपाच्या माजी खासदाराचा खुलासा

या माजी खासदाराने भाषणादरम्यान हे वक्तव्य केलं तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंचावर त्यांच्या बाजूलाच बसलेले होते.

datta meghe
एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलं हे भाष्य

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये मोठा खुलासा केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचे नाव आपण मृत्यूपत्रामध्ये लिहलेलं आहे, असं खुद्द दत्ता मेघे यांनी सांगितलं आहे. मेघे हे वर्ध्यात नगरपालिकेच्या विविध कामाच्या ई भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. गडकरी यांच्या हस्ते नगरपालिकेच्या कामांचं ई भूमिपूजन करण्यात आले.

गडकरी हे आमच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत. मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होऊ नये यासाठी आपण मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं आहे. देशातील नेतृत्व दिवस रात्र काम करुन या देशाचा विकास झाला पाहिजे यासाठी झटत आहे. गडकरी हे देशातील प्रत्येक राज्यामध्ये जाऊन काम करत आहेत, असं मोघे यांनी म्हटलं आहे. मेघे यांनी भाषणादरम्यान हे वक्तव्य केलं तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंचावर त्यांच्या बाजूलाच बसलेले होते.

या कार्यक्रमाला गडकरींबरोबरच खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरीता गाखरे, नगराध्यक्ष अतुल तराळे यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Datta meghe says i have written nitin gadkari name in my will scsg

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!