Ajit Pawar Birthday : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार हे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्याआधी त्यांनी केलेली खास पोस्ट मात्र चर्चेत आली आहे. अनेकांना अजित पवार यांचा हा खास अंदाज भावला आहे. अजित पवार Ajit Pawar हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि वेगाने केलेल्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत. घरातून बाहेर पडण्याआधी त्यांना त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी गुलाबाचं फूल दिलं. याविषयीची पोस्ट अजित पवारांनी केली आहे.

अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट

अजित पवार Ajit Pawar यांच्या प्रसिद्धीचं काम पाहणाऱ्या कंपनीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक रणनीती निश्चित केली. त्यानुसार महिला मतदारांपर्यंत पोहचायचं असेल तर गुलाबी रंगाचा वापर वाढवावा असा सल्ला अजित पवारांना Ajit Pawar आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आला. ज्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंग ठळक आणि ठसठशीत पणे दिसू लागला. आज अजित पवारांचा (Ajit Pawar) वाढदिवस आहे त्याआधी घरातून बाहेर पडत असतानाही त्यांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं. अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या पत्नीसह पहिल्यांदाच असा खास फोटो पोस्ट केला आहे. तसंच या फोटोसाठी छानसं कॅप्शनही दिलं आहे. हा फोटो आणि अजित पवारांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हे पण वाचा- अजित पवारांची स्वबळाची घोषणा का ?

अजित पवार यांची पोस्ट काय?

“मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनी ने गुलाबाचे फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ” असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट घेऊन बाहेर पडले. अजित पवार हे थेट सत्तेत सहभागी झाले. ज्यानंतरची लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार होत्या. तर महाविकास आघाडीने सुप्रिया सुळेंना तिकिट दिलं. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाली तरीही प्रत्यक्षात ही लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी खास पोस्ट केली आहे. जी चर्चेत आहे. (फोटो-लोकसत्ता टीम)

अजित पवारांची पोस्ट चर्चेत

अजित पवार (Ajit Pawar) हे असे राजकारणी आहेत जे व्यक्तिगत आयुष्याबद्दल फारसे व्यक्त होत नाहीत. अशात सुनेत्रा पवार यांनी त्यांना जे फूल दिलं त्याचा फोटो पोस्ट करत त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांचं कौतुक केलं आहे. यानंतर या पोस्टची चर्चा माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सकाळीच अजित पवार यांना दूरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनीही अमित शाह यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.