Devendra Fadnavis : आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता आपल्याला जागं राहून, सावध राहून निवडणुकीला सामोरं जायचं आहे हे कुणीही विसरु नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याच प्रमाणे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा मनाला खूप दुःख झालं अशी बोचरी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत काय घडलं?

महाराष्ट्रात जी लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात निराशा आली. कारण इतक्या कमी जागा येतील असं वाटलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा बनण्यासाठी कौल जनतेने दिला. त्याचवेळी महाराष्ट्रात आपण कमी पडलो याची खंतही आपल्याला आहे. महाराष्ट्रात पक्षात आपली लढाई तीन पक्षांशी नव्हती. चार पक्षांशी होती, चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. रोज खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं तसं झालं की ते लोकांना खरं वाटू लागतं. इतके निर्लज्ज लोक आहेत की त्यांना खोटं बोलल्याशिवाय सकाळचा नाश्ताही घशाखाली उतरत नाही आणि रात्रीचं जेवणही. फेक नरेटिव्हला आपण परिणामकारक रित्या उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा परिणाम असा झाला की काही मतं कमी झाली असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. केवळ दोन लाख मतांमुळे त्यांचे ३० खासदार आले आणि आपले १७ खासदार आले. ४०० पार संविधान बदलण्यासाठी आहे हा खोटा समज विरोधकांनी पसरवला. असंही Devendra Fadnavis यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीने बाजारु विचारवंतांना बरोबर घेतलं

राहुल गांधींवर विश्वास नाही, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंवर विश्वास नाही. मग काही बाजारु विचावंतांना यांनी बरोबर घेतलं आणि ते सांगू लागले की आपण निवडून आलो तर संविधान बदलू. आपलं आरक्षण जाईल, खरं म्हणजे हे सगळ्यांना माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण, तसंच राज्यघटना बदलता येत नाही. तरीही हे रोज खोटं बोलत होते. वेगळं कन्सॉलिडेशन झालं हे आपण पाहिलं. खरं तर आपण इतिहासात गेलो तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ५० वर्षांसाठी आरक्षण दिलं होतं. आरक्षण संपल्यानंतर वाजपेयी सरकार होतं. त्यावेळी त्यांच्या सरकारने संविधान दुरुस्त करुन आरक्षणाला मुदतवाढ दिली. तसंच पंतप्रधान मोदींनी सांगितलं की चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कुणीही संविधानाला हात लावू शकणार नाही. तरीही खोटं बोलून मतं विरोधकांनी मिळवली. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे, औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत..”; देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलंं आणि…

मला एका गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटतं. पक्ष फुटतात, पक्ष एकमेकांबरोबर रहात नाहीत. पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा मला मनापासून दुःख झालं. आता या ठिकाणी कुणाकडून अपेक्षा करावी? आमचा विरोध कुठल्याही जातीला किंवा धर्माला नाही. आमचं म्हणणं इतकंच आहे की लांगुलचालन चालणार नाही. आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना संधी, अधिकार असतील. पण एका विशिष्ट वर्गाला हाताशी धरुन त्यांच्या बळावर आम्ही निवडून येऊ असं कुणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार की नाही? त्याचं उत्तर आपल्याला आता द्यायचं आहे. असंही देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) स्पष्ट केलं.

मी आज आपल्याला एक विनंती करायला आलो आहे-फडणवीस

मी आपल्याला विनंती करायला आलो आहे. जे काही घडलं की तो एक प्रयोग आहे. पहिल्यांदा प्रयोग केला तो कर्नाटकमध्ये त्यानंतर भारतात प्रयोग केला आणि आता महाराष्ट्रात तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न चालला आहे. पण मला विश्वास आहे की ज्या प्रकारे आपलं सरकार मैदानात उतरलं. गाफील असताना एकदाच खिंडीत गाठता येतं. आता आम्ही गाफील नाही, कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आम्हाला हे समजतं की आपल्याला जागं रहावं लागेल. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची उद्ध ठाकरेंवर बोचरी टीका

लाडकी बहीण योजनेला विरोधक घाबरले

आज यांची (महाविकास आघाडी) अवस्था काय आहे? साधी लाडकी बहीण योजना घोषित केली तर घाबरले. आता म्हणतात निवडणुकीपुरतं आहे, म्हणाले निवडणूक झाली की योजना बंद करतील. काँग्रेसचे लोक तर न्यायालयात गेले म्हणाले लाडकी बहीण योजना बंद करुन टाका. मला कळत नाही की यांच्या का पोटात दुखतं? माझा सवाल आहे तुम्ही १५०० रुपये देऊ शकत नाही, मग तुमचे राहुल गांधी जे खटाखट खटाखट देणार होते ते काय झाडाला लागणार होते का? का त्यांना कुठला खजिना, हंडे काही सापडले? लाडकी बहीण योजना जी तयार केली आहे त्यात ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तो निधी मिळून जाईल. ज्यांचे फॉर्म उशिरा येतील त्यांना पुढेही तो निधी मिळेल. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सांगितलं.