सांगली: जत तालुक्यातील रामपूर येथे तरुण व तरुणीचे मंगळवारी सकाळी मृतदेह आढळले आहेत. रामपुर गावातील कोळेकर वस्ती येथील शेतातील ही घटना असून मृतदेहांच्या शेजारी विषारी औषधांच्या बाटल्या आढळून आल्या.
आणखी वाचा- भिंतीखाली दबून तीन कामगारांचा मृत्यू, चाळीसगावात गटार बांधकाम करताना दुर्घटना
आत्महत्या असल्याचं चित्र दिसत असले तरी, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणाची ओळख पटली असून त्याचे उमेश कोळेकर असे नाव आहे. दोघेही पंचवीस वयोगटातील असून प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचाही कयास आहे. पोलीस घटनास्थळी गेले असून चौकशीनंतरच अधिकृत माहिती देण्यात येईल असे सांगितले.