सोलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या उंड्डाणपुलावरून हरणांचा कळप खाली कोसळून त्यात एकाचवेळी १४ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूर-पुणे महामार्गावरील केगाव येथे विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. या घटनेला वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांवरील टीकेवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
हेही वाचा – आगामी कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
केगाव-विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर देशमुख वस्तीनजीक उड्डाणपूल आहे. या भागात हरणांसह काळविट व इतर वन्य प्राण्यांच्या कळपांचा नेहमीच वावर असतो. आसपासचा बहुतांशी परिसर सपाट आणि तुलनेत कमी वर्दळीचा आहे. हरीण व काळविटांचे कळप राष्ट्रीय महामार्गावर येतात आणि रस्ता ओलांडून पुढे जातात. रस्त्यावरील वाहनांमुळे भीतीने पुढे पळत असताना अपघात होतात. उड्डाणपुलावरून पुढे पळताना काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली कोसळतो आणि त्यांचे जीव जातात. असे प्रकार नेहमीच घडतात, असे केगाव परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.