अलिबाग - किल्ले रायगडावर पुण्याहून आलेल्या पर्यटकाचा दरड कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रशांत गुंड, असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हेही वाचा - सांगली : कॉंग्रेसच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार पुण्याहून प्रशांत गुंड हा तरुण किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आला होता. पायरी मार्गाने गड चढत असताना महादरवाजा जवळ वादळी पावसामुळे एक दरड कोसळली, यात प्रशांतचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. महाड तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.