विजेच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू

चंदनखेडा शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून वाघीण फिरत असल्याची चर्चा होती. आज काही मजूर शेतात  जात असताना त्यांना वाघिणीचा  मृतदेह दिसला.

चंदनखेडा शेतशिवारातील घटना

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील वायगाव मार्गालगत असलेल्या शेतशिवारात आज ११ नोव्हेंबरच्या सकाळी  वाघिणीचा मृतदेह आढळून आला. मृत वाघीण दोन ते अडीच वर्षांची आहे. वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी, विद्युत धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चंदनखेडा शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून वाघीण फिरत असल्याची चर्चा होती. आज काही मजूर शेतात  जात असताना त्यांना वाघिणीचा  मृतदेह दिसला. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मृत्यू  नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांच्याशी संपर्क साधला असता, जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वीच वरोरा परिसरात एक वाघ शिकारीच्या शोधात विहिरीत पडला होता.

१ ताब्यात, १ फरार

वाघीण मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी म्हणून शेतमजूर नीलकंठ गोविंदा दडमल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर शेतमालक गजेंद्र रणदिवे हा फरार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Death of tiger due to electric shock akp

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या