scorecardresearch

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताच्या फोननंतर ‘अँटिलिया’ची सुरक्षा वाढवली

ऑगस्ट महिन्यातही मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताच्या फोननंतर ‘अँटिलिया’ची सुरक्षा वाढवली

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘रिलायन्स’ उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. ‘रिलायन्स’ फाऊंडेशनच्या कार्यालयात अज्ञाताने फोन करत अंबानी कुटुंबियांना धमकी दिली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Dasara Melava 2022: मेळाव्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री शिंदेंचं Tweet; मराठी, हिंदुत्वाचा उल्लेख करत म्हणाले, “आपण…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची मिळालेली धमकी ताजी असतानाचा मुकेश अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दुपारी एकच्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशनच्या सर एचएन रुग्णालयाच्या क्रमांकावर अज्ञाताने फोन करत रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. याचबरोबर मुकेश अंबानी आणि निता अंबानींना ठार करणार असल्याचेही या अज्ञाताने या फोनवर म्हटले आहे. डीबी मार्ग पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पुढीत तपास पोलीस करत आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यातही मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या