रायगड – मुंबईहून १७ जण माणगाव येथे देवकुंड सहलीसाठी आले होते. यातील दिनेश तुकाराम शिंदे रा. दहीसर याचा म्हसेवाडी येथील कुंडलिका नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. आपल्या मित्रासमवेत तो पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याला मित्रांनी तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.    

महाड येथे एनडीआऱएफ पथक दाखल

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू

राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाची एक तुकडी महाड येथे दाखल झाली आहे. पावसाळ्यात कोकणात होणारी अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांची पार्श्वभुमी लक्षात घेऊन कोकणात खबरदारी म्हणून हे पथक तैनात असणार आहे. २३ जणांचे एक पथक सोमवारी महाड येथे दाखल झाले आहे.