शेतीपंपास दिवसा १० तास वीज देण्याबाबतचा अहवाल येत्या १५ दिवसात तज्ञ समितीकडून घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवरी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिला. तर राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

शेतकरी वीज प्रश्नांवर कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. याप्रश्नी सोमवारी मुंबई येथे उर्जामंत्री राऊत व शेट्टी यांच्यात चर्चा झाली.

ladki bahin yojana, ladki bahin yojana maharashtra,
लाडकी बहीण योजनेसाठी पनवेल पालिकेचे तीन फिरते मदत कक्ष
Vishalgad, encroachment, Vishalgad Encroachment Controversy, Accusations Guardian Minister, Hasan Mushrif, District Collector, Rahul Rekhawar, anti encroachment, Hindu devotees, High Court, action committee, archaeological neglect
विशाळगड प्रश्नास पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार जबाबदार; विशाळगड रक्षण समितीने फोडले खापर
case filed against shiv sena shinde group district chief for threat and extortion contractor
शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुखावर ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल
onion, Nashik, Central Agriculture Committee,
लोकसभा निकालानंतर प्रथमच केंद्रीय कृषी समिती नाशिक दौऱ्यावर, सरकारी कांदा खरेदीतील त्रुटी शोधण्यावर लक्ष
mumbai footpath encroachment marathi news
अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण यांवर कठोर कारवाई करा, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश
Swabhimani Farmers Sangathan, walk,
कागल ते कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेला सुरुवात
Vasantrao Naik farmer debt relief movement started in the state from July 1 Announcement by Raju Shetty
राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू; राजू शेट्टी यांची घोषणा
Kisan Sabhas statewide struggle week begins tomorrow Daily movements
किसान सभेचा राज्यव्यापी संघर्ष सप्ताह उद्यापासून सुरू; दररोज आंदोलने

 राज्य सरकारकडून सध्याची वीजेचे वेळापत्रक व शेतीपंपास दिवसा वीज दिल्यानंतर महावितरणच्या विद्युत वहन क्षमता व आर्थिक भार याबाबतची माहिती दिली. मात्र उर्जामंत्री व अधिका-यांच्या नकारार्थी भूमिकेपुढे बैठकीच्या सुरवातीस संतापलेल्या शेट्टी यांनी विद्युत भाराच्या विभागणीत सरकारला बळी घ्यायला शेतकरीच दिसू लागला आहे का? असा संतप्त सवाल केला. महावितरणला शेतकऱ्यांना शेतीपंपास दिवसा १० तास वीज पुरवठा कसा शक्य आहे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती सादर केली.  

दीड तास चाललेल्या बैठकीनंतर उर्जामंत्र्यांनी आंदोलन १५ दिवस थांबविण्याची विनंती केली. पण शेट्टी यांनी याबाबत उद्या प्रमुख पदाधिकारी यांचेसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगून बैठक संपवली. पालकमंत्री सतेज पाटील, महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल, आमदार अरूण लाड, आमदार ऋतुराज पाटील, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक प्रकाश पोपळे, संदीप जगताप आदी उपस्थित होते.