गद्दारी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी किंवा ठाणे मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. याला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी ठाण्यात उभं राहून डिपॉजिट वाचवून दाखवावं, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
“तुम्हाला वरळीतून निवडून येण्यासाठी दोन विधानपरिषद आमदार करावे लागले. तेव्हा तुम्ही आमदार झाला आहात. जनतेतील लोक लाखांच्या फरकाने निवडून येतात. त्यांना आपल्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी जावं लागत नाही,” असा टोला केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला.




हेही वाचा : “भारत, इंडिया, हिंदुस्तान, काय जातंय ३ नावं घ्यायला?” राज ठाकरे यांची फटकेबाजी
“हाडाच्या कार्यकर्त्यांना नाराज करू नका”
“तुम्ही वरळीसाठी काय केलं? याचा विचार करायला हवा. सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे वरळीत काम करतात. तुम्हाला निवडून येण्यासाठी दोन आमदार का करावे लागले? तुम्ही राजपुत्राच्या भूमिकेत असता. त्याच भूमिकेत तुम्ही राहा. पण, हाडाच्या कार्यकर्त्यांना नाराज करू नका. त्यांच्या मेहनतीला कमी लेखू नका,” असेही दीपक केसरकर यांनी म्हटलं.
हेही वाचा : “अर्थखातं कधीपर्यंत टिकेल सांगता येत नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…
“राज्य सरकार निधीची घोषणा करतं, पण…”
“राज्यातील सरकार गद्दार, गँगस्टर, बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांचे आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली असून, त्याकडं सत्ताधारी लक्ष देत नाहीत, ही खेदाची बाब आहे. अनेक योजनांसाठी राज्य सरकार निधीची घोषण करतं. पण, प्रत्यक्षात निधी देत नाही,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.