deepak kesarkar criticized uddhav thackeray on dasara melava speech spb 94 | Loksatta

दसरा मेळाव्यातील भाषणावरून केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली होती. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दसरा मेळाव्यातील भाषणावरून केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”
उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर (संग्रहित फोटो)

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली होती. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. डुक्कर म्हणणे हे संजय राऊतांच्या तोंडी शोभते. मात्र, उद्धव ठाकरेंना हे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला

काय म्हणाले दीपक केसरकर?

“दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे मी अस्वस्थ झालो होतो. माझी त्यांच्याशी बांधिलकी होती आणि पुढेही राहणार आहे. ही बांधिलकी त्यांच्या चांगल्या विचारसरणीबद्दल आहे. कोणालातरी डुक्कर म्हणणे हे संजय राऊतांच्या तोंडी शोभू शकते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

“जेवढा आदर मला उद्धव ठाकरेंबद्दल आहे, तेवढाच आदर मला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे. कारण ते खरे शिवसैनिक आहे. त्या शिवसैनिकांचा जर अपमान होत असेल, तर तो माझा अपमान असे मी समजतो. शिवसैनिकांचा अपमान मी बघू शकत नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…मग तू काय काम करणार,” उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची खोचक टीका; आजारपणाचाही केला उल्लेख, म्हणाले…

दरम्यान, यावेळी त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबतही प्रतिक्रिया दिली. “आमची आणि भाजपाची युती आहे. जर भाजपा आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडू शकत असेल, तर आम्ही एका आमदाराकीसाठी हट्ट करणे योग्य नाही.”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरेंनी बाळासाहेबांना मनस्तापच दिला”; उद्धव ठाकरेंच्या आतेबहिणीचे आरोप

संबंधित बातम्या

“अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश
“…तर सरकार चालवण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार” ; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!
जे पोटात होतं ते ओठावर आलं; अजित पवारांच्या मनातले मुख्यमंत्री अजूनही उद्धव ठाकरेच, भर पत्रकार परिषदेत घडला किस्सा
“… अन्यथा सुषमा अंधारेंची सभा उधळून लावणार; राडा तर होणारचं”; उस्मानाबादच्या मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा!
घरकुलासाठी उपोषण करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मृत्यू, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मविआ’चा १७ डिसेंबरला महामोर्चा; राज्यपाल, सीमाप्रश्नाबाबत आक्रमक भूमिका
राज्यात लवकरच नवे उद्योग धोरण- फडणवीस
महिलांची ‘आयपीएल’ स्पर्धा महत्त्वाची -हरमनप्रीत कौर
FIFA World Cup 2022: पोर्तुगालसमोर स्विर्त्झंलडचे आव्हान
सेवाभावी कामांमागे धर्मांतराचा हेतू असू नये!; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी