मोदी सरकारने नामिबिया देशातून ८ चिते आणल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चिता सरकार म्हणायचे का? असा खोचक सवाल त्यांनी भाजपाला केला होता. त्यांच्या याच टीकेला शिंदे गटातील आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. वाघाला चिता म्हणाले म्हणून तो काही चिता होत नसतो. वाघाने डरकाळी फोडल्यानंतर काय झाले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> “राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Sharad pawar devendra Fadnavis (1)
“मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”

वाघाला चिता म्हटलं तर तो चिता होत नसतो. वाघ हा वाघच असतो. वाघाने जेव्हा डरकाळी फोडली तेव्हा महाराष्ट्रात काय झाले, हे सर्वांनीच पाहिलेले आहे, असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला. पुढे बोलताना केसरकर यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही भाष्य केले. दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं. ती भारतीय संस्कृती आहे. अनेकांना (राष्ट्रवादी, काँग्रेस) हा कमीपणा वाटतो. पण सत्तेच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना ते (राष्ट्रवादी, काँग्रेस) कसे चालतात? असा सवाल दीपक केसरकर यांनी केला.

हेही वाचा >>> “पहिल्या यादीत माझे नाव होते, पण ऐनवेळी…” मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचे महत्त्वाचे विधान

उद्धव ठाकरे कुठेतरी मेळावा घेणारच आहेत. मग तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंचावर निमंत्रित पाहुणे म्हणून बोलवावे. ते येतात की नाही हे समजेल. औरंगाबादचे संभाजीनगर करायचे होते, तेव्हा अनेकजण मंत्रीमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. पुढे औरंगाबादचे संभाजीनगर केले म्हणून त्यांनी खोटी जाहिरात केली. आम्हाला तो ठराव पुन्हा घ्यावा लागला. आतातरी राजकारण थांबवुया आणि विकासाचे काम करुया, असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले ८ चित्ते सोडण्यात आले. भारतातून सात दशकांपूर्वी नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतीय भूमीवर दाखल झाले आहेत. यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चिता सरकार म्हणायचे का? असा खोचक सवाल त्यांनी भाजपाला विचारला. २०१७-१८ मध्ये दक्षिण कोरियातून ‘हम्बोल्ड’ पेंग्विन राणीच्या बागेत आणण्यात आले होते. पेंग्विन खरेदीसाठी आणि त्यांच्यासाठी वातानुकूलित कक्ष तयार करण्यासाठी एकूण २५ कोटींचा खर्च करण्यात आला. त्यावेळी अनेक वेळा भाजपाकडून शिवसेनेचा पेंग्विन सेना म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.