केवळ सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची तत्व उद्धव ठाकरे यांनी बाजूला ठेवली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी शिवसेनेत गेलो. नाहीतर भाजपात प्रवेश केला असता, असं विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. दीपक केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरे स्वत:हा न्यायाधीश आहेत. स्वत:हा बोलतात, कारण त्यांचं विश्वच वेगळं आहे. ते कल्पनेच्या विश्वात वावरतात. त्यामुळे पक्षात असलेला असंतोष त्यांना माहित नव्हता. बाळासाहेबांनी मराठी माणसं आणि हिंदुत्वाचा आवाज उठवण्यासाठी पक्ष स्थापन केला. शेवटपर्यंत आपली तत्व जपली." हेही वाचा : “फुकट मदत केली लोकांना वाटतं, हा मंत्री आहे याच्याकडे हरामाचा पैसा…”; नितीन गडकरींचं वक्तव्य "भाजपाची दूददृष्टी स्पष्ट आहे" "पण, केवळ सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी तत्व बाजूला ठेवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या काळात सुरू असलेलं कोणालाही पसंत नव्हतं. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी शिवसेनेत गेलो. अन्यथा भाजपात प्रवेश केला असता. भाजपाची दूददृष्टी स्पष्ट आहे," असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. "…म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो" "सनातन धर्म आणि वीर सावरकरांना शिव्या घातल्यावर ठाकरे गट एक शब्दही बोलला नाहीत. कारण, मिळणारी पद आणि ताकद कमी होईल. पण, बाळासाहेबांनी असं कधीच केलं नाही. युतीच्या विरोधात मतदान करायला सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. याला बाळासाहेबांचे विचार म्हणतात. म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिलो," असं केसरकर यांनी म्हटलं. हेही वाचा : “…म्हणून शरद पवारांनी रोहित पवारांच्या कंपनीवरील कारवाईवर बोलणं टाळलं”, शिंदे गटाचा टोला "पक्षांतरला कुठलीच बंदी नाही" "आम्हाला स्वत:ची आमदारकी वाचवायची होती, तर दुसऱ्या पक्षात गेलो असतो. पक्षांतरला कुठलीच बंदी नाही," असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.