‘उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. त्यामुळे आम्ही प्रत्युत्तर देणार नाही’ असे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे. गोव्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केसरकरांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यावेळेस केरसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जवळचा आहे असे वाटत असेल, पण हा भ्रम नक्की दूर होईल. जोपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदे सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असे केसकरांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदेवर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर
एकनाथ शिंदेविरोधात करण्यात आलेली कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही. याबाबत शिवसेनेला रीतसर उत्तर पाठवण्यात येईल, असेही केसकर म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याबाबतचं पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ, असेही केसकर म्हणाले.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

पक्षात राहण्यासाठी प्रेमाचं बंधन महत्वाचं
पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नाही तर प्रेमाच बंधन महत्वाचं आहे. शिवबंधन हे प्रेमाचं बंधन आहे आणि आजही आमच्या हातात शिवबंधन आहे. बाळासाहेबांच्या आठवणीत आम्ही हे शिवबंधन घालतो. आम्ही खरे शिवसैनिक असल्याचेही केसरकर म्हणाले.