scorecardresearch

‘स्वाभिमान शेण खायला गेलाय का?’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्यापेक्षा वाईट…”

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सकडून टीका केली होती.

‘स्वाभिमान शेण खायला गेलाय का?’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्यापेक्षा वाईट…”
संग्रहित फोटो

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सकडून टीका केली होती. एक मुख्यमंत्री आमची गावं खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरे राज्य आमचे उद्योग खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुमचा स्वाभिमान कोठे शेण खायला गेलाय का? असे संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान, राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते कोल्हापुरात पत्राकारांशी बोलत होते.

हेही वाचा – मनसेची मोठी घोषणा, राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर-कोकण दौऱ्यावर जाणार, कधी-कुठे? वाचा…

“संजय राऊतांएवढं वाईट महाराष्ट्रात कोणीही बोलू शकत नाही. ते एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. एकीकडे आपण मराठी भाषेचा गौरव, अभिमान याविषयी बोलतो आणि दुसरीकडे मराठी भाषेतील वाईट शब्द लोकांना दाखवले, तर तुम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे का? हा प्रश्नही पडतो”, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.

हेही वाचा – “राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या”; शिवरायांबद्दलच्या विधानावरुन पवारांचा संताप! म्हणाले, “अशा व्यक्तीला…”

“संजय राऊत काय बोलतात याकडे फारसं गांभीर्याने बघायची गरज नाही. आधी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार हा एकच त्यांच्याकडे मुद्दा होता. आता त्यांनी पाच तुकडे करतील अशा नवीन मुद्दा काढला आहे. शेवटी सत्ता गेल्यानंतर माणूस काहाही बोलू लागतो, अशी गत ठाकरे गटाची झाली आहे. त्यामुळे ते काहीही विधान करत असतात”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात बेबनाव…’; काँग्रेस नेत्याचं विधान!

यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरही प्रतिक्रिया दिली. “आज सत्ता गेल्यानंतर तुम्हाला वेगळ्या विचारसरणीचे लोक जवळचे वाटत आहेत. ज्यांनी रथयात्रा रोखली होती, त्या राज्यात जाता आणि लोटांगण घालता? यापेक्षा दुसरं दुर्देवं नाही. राम मंदिरासाठी असलेली हिंदूंची रथयात्रा ज्या माणसाने अडवली, त्यांच्याच मुलाला जाऊन तुम्ही भेटता. यावरून सत्तेपुढे तुम्ही किती लोटांगण घालता, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले आहे. मराठी माणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही” , अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या