scorecardresearch

Deepak Sawant Car Accident : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या गाडीला अपघात; डंपरने दिली मागून धडक

Deepak Sawant Injured In Car Accident : अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दीपक सावंतांवर उपचार सुरू

Deepak Sawant Car Accident : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या गाडीला अपघात; डंपरने दिली मागून धडक
(माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत कार अपघात)

Deepak Sawant Health Update : घोडबंदर येथून पालघरच्या दिशेने प्रवास करत असताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. डंपरने गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून सावंत हे स्वतःच रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

पालघरच्या मोखाद्यात कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी दीपक सावंत जात होते. दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास घोडबंदर येथील सगनाई नाका येथे पोहचले असताना त्यांच्या गाडीला एका डंपरने मागून धडक दिली. यात सावंत यांच्या पाठीला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काशिमीरा पोलिसांनी धाव घेऊन डंपर चालक इर्शाद शहजाद खान याला ताब्यात घेतले आहे. तर सावंत हे स्वतःच रुग्णावाहिकेने प्रवास करून अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

या घटनेतील दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 14:12 IST

संबंधित बातम्या