शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या असून ते भाजपासह इतर पर्याय तपासून पाहत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी दोन वेळा राज ठाकरे यांनादेखील फोनवरुन संपर्क साधला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दाखल देता परतण्याचा सल्ला जपून घेण्यास सांगितले आहे.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे फडणवीस? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले “जे बोलतात पुन्हा येईन…”

“मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली, असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता ११ वरून १ वर आले आहेत. आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते, वजा नाही. त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशोब बघून घ्या. मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन आहे,” असे ट्वीट दीपाली सय्यद यांनी केले आहे.

हेही वाचा >>> राजसाहेबांबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’ चित्रपटातील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकूण दोन वेळा फोन कॉल केल्याचे म्हटले जात आहे. यावेळी त्यांनी राज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चादेखील झाली आहे. याच कारणामुळे दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य करत एकनाथ शिंदे यांना वरील सल्ला दिला आहे

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis: संजय राऊतांचे बंधूही गुवाहाटीला जाणार? सुनील राऊत म्हणाले, “माझ्यासाठी आमदारकी…”

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला तूर्त दिलासा दिला आहे. ११ जुलैपर्यंत निलंबनाची कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर दुसरीकडे कोर्टाच्या या आदेशानंतर एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबईत येऊन भेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी गुवाहाटीमध्ये बैठका आयोजित केल्या जात आहेत.