शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून ओळख मिळावी, त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी, याकरिता त्यांची भेट घेतल्याचे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे.
‘भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपती मुर्मू या आदिवासी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तशाच प्रकारचा पाठिंबा आता एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून मिळावा, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.” त्याकरिताच आज त्यांची भेट घेतल्याचे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे.




एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत बंडखोर आमदारांवर टीका केली होती. ”शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का? उद्धव साहेबां विरोधात चिरीट तोम्मया बोलणार आणि तुम्ही ऐकून घेणार हिच का शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे? पहिले चिरीटला तुमच्या पंक्तीतून बाहेर काढा नंतर शिवसैनिक नाव लावा.”, अशी खोचक टीका दिपाली सय्यद यांनी केली होती.
हेही वाचा – “…म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो”, गुरूपोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना