कोपर्डी प्रकरणातील बचाव पक्षाचे वकील योहान मकासरे यांना अज्ञात व्यक्तींनी फोनवरुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपर्डीत जुलै २०१६ मध्ये १५ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे या नराधमांना अटक केली. या तिन्ही आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव जिल्ह्यातील वकील संघटनेने घेतला होता. शेवटी संतोष भवाळच्या वतीने पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब खोपडे यांनी वकीलपत्र स्वीकारले. तर नितीन भैलुमेच्या वतीने प्रकाश आहेर यांनी वकीलपत्र स्वीकारले. पण मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्यावतीने कोणीही वकीलपत्र स्वीकारले नव्हते. शेवटी न्यायालयाने या प्रकरणात योहान मोकासरे यांची नियुक्ती केली होती.

Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगरमधील जिल्हा सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. जितेंद्र शिंदेच्या वतीने बाजू मांडताना योहान मकासरे यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा नाही. जितेंद्रला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती.

योहान मकासरे यांनी दोषींना कमी शिक्षेची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने फोनवरुन त्यांना धमकी दिली. मकासरे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. यापूर्वी या प्रकरणातील भैलुमेचे वकील प्रकाश आहेर यांना देखील फोन करुन जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.