काँग्रेस अध्यपदावरून राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास गेहलोत गटाच्या आमदारांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या ९० आमदारांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे. या सर्व घडोमोडींवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“आमचा पक्ष जनतेसाठी काम करत असून, शाळा, रुग्णालयांची बांधणी करतो आहे. जनतेला तोडफोडीचे राजकारण आवडत नाही. दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये आता आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होईल. काँग्रेसला आपले घर सांभाळता येत नाही,” अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

हेही वाचा – राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…”

“भाजपा आणि काँग्रेस तोड-फोडीचं राजकारण करतात. ते म्हणतात केजरीवालांनी मोफत देण्याचे बंद करावे. आज देशातील जनतेला आम आदमी पक्षाकडून अपेक्षा आहेत. आम्ही देशाला पुढे घेऊन जाणार आहोत,” असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.