scorecardresearch

Premium

Shraddha Murder Case: “जर त्याने मृतदेहाचे तुकडे केले असतील, तर त्याचेही…”; श्रद्धाच्या वडिलांचा संताप, पहिल्यांदाच झाले व्यक्त

Delhi Murder Case: श्रद्धा अजूनही जिवंत असू शकते, वडिलांना आशा

Delhi Vasai Murder Case
श्रद्धा अजूनही जिवंत असू शकते, वडिलांना आशा

Shraddha Walkar Murder Case: वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर हिची तिच्याच प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या केल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला आफताबला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यांनी आपली मुलगी अद्याप जिवंत असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

आपली मुलगी जिवंत असेल अशी आशा अद्यापही कायम असून पोलीस आफताबने दिलेली माहिती पडताळून पाहत असल्याचं विकास वालकर यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की “पोलिसांना अद्याप फक्त आठ ते १० तुकडे सापडले आहेत. तो मुंबई पोलिसांसमोर खोटं बोलला आणि दिल्ली पोलिसांसमोर लगेच गुन्हा कबूल केला हे कसं काय शक्य आहे?,” अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

supriya sule denies contact of praful patel with sharad pawar
शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
chandrasekhar bawankule target prithviraj chavan in akola
कराड : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य करावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान 
Pankaja munde
“…म्हणून मी कोणत्याही आधाराशिवाय टिकले”, संघर्षकन्येनं सांगितलं सहनशीलकन्या होण्यामागचं कारण!
Gulabrao Patil on Sanjay Raut Khalistan issue
VIDEO: संजय राऊतांनी खलिस्तान आणि पुलवामाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

यावेळी त्यांना आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे असं विचारण्यात आलं असता, फासावर लटकवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. फाशीपेक्षाही काही भयंकर शिक्षा असेल तर ती शिक्षा आफताबला दिली पाहिजे असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने नोंदवला जबाब

“जर त्याने मृतदेहाचे तुकडे केले असतील तर त्याचेही तुकडे झाले पाहिजेत. फाशी द्या, त्यापेक्षाही भयंकर शिक्षा असेल तर ती द्या,” अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले “आफताबने जे काही सांगितलं आहे त्याची अद्याप खात्री झालेली नाही. जर ते खरं असेल तर त्याला फासावर लटकवलं पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत. श्रद्धाच्या वडिलांनी यावेळी २०२१ मध्ये मुलीशी शेवटचं बोलणं झाल्याची माहिती दिली.

“आफताबशी भेट झाल्यानंतर श्रद्धा बदलली होती”

आफताबशी ओळख झाल्यानंतर श्रद्धा बदलली होती असं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. “आफताबशी भेट होण्याआधी तिला फॅशनची माहिती नव्हती. त्याची भेट झाल्यानंतर तिच्या राहणीमानात बदल झाला होता,” असं विकास वालकर यांनी सांगितलं. दरम्यान तिच्या मित्रांमुळेच आपल्याला ती बेपत्ता झाली असल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“माझ्या पत्नीचं निधन झाल्यानंतर आफताब आमच्या घरी य़ेऊन भेट घेत होता. पण त्यावेळी मी दुखात असल्याने त्याच्याशी काही बोलणं झालं नव्हतं,” असं विकास वालकर यांनी सांगितलं आहे. मला माझी मुलगी चांगल्या स्थितीत आहे असंच वाटत होतं. जुलै महिन्यात तिचे मित्र माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतच मला तिच्याशी संपर्क होत नसल्याचं कळालं असं त्यांनी सांगितलं.

तुमचं आरोपी आफताबशी काही बोलणं झालं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी हो असं उत्तर दिलं. गेले पाच महिने एकही शब्द उच्चारला नसताना अचानक गुन्हा कबूल का केला अशी विचारणा आपण त्याला केल्याची माहिती त्यांनी दिली. “हो, आमचं बोलणं झालं. दिल्ली पोलिसांसमोरच मी त्याला तू एका दिवसात गुन्हा कसा काय कबूल केलास? याआधी तर माहिती नाही असं सांगत होतास अशी विचारणा केली,” असल्याची माहिती त्यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi vasai murder shraddha walkar father vikas walkar says he want accused aftab to be hanged sgy

First published on: 15-11-2022 at 11:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×