अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अकोला येथील एका किर्तनादरम्यान युट्यूबर्ससंदर्भात केलेलं वक्तव्यावरुन इंदुरीकर महाराज अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्ता रंजना गवांदे यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात पुण्यातील दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करुन तथ्य अढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय.

दोन पुणेकरांनी केली तक्रार…
“अकोल्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यांनी माझे युट्यूब अपलोड केले असे चार हजार लोक कोट्याधीश झाले. त्यांनीच मला कोर्टात खेचलं. त्यांचं वाटोळं होईल आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारी मुलं दिव्यांग असतील, अशाप्रकारचं वक्तव्य केलंय,” असं गवांदे यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, हे आक्षेपार्ह वक्तव्य आहे. या वक्तव्याविरोधात पुण्यात दोन लोकांना तक्रार केलीय. दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार केलीय,” असंही गवांदे म्हणाल्या आहेत.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

पोलिसांना चौकशीचे आदेश…
“या तक्रारनुसार पुण्यातील दिव्यांग कल्याण आयुक्तांनी अकोल्याच्या पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे. या गुन्ह्याची चौकशी करुन यात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करावा अशाप्रकारचे आदेश दिलेत. हे जे निवृत्ती इंदुरीकर ज्यांना निवृत्ती महाराज संबोधलं जातं यांनी यांच्यापूर्वीही अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत,” असंही गवांदे म्हणाल्यात. “यापूर्वी एका प्रकरणात पीसीपीएडीटी अॅक्टअंतर्गत जे वक्तव्य केलंय त्यासंदर्भात महाराष्ट्र अंनिसने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. अद्याप ते प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे,” अशी माहिती गवांदे यांनी दिली.

चौकशी करुन गुन्हा दाखल करा…
“करोनाच्या काळात सरकार एकीकडे सांगत होते लस घ्या. त्यावेळेस इंदूरीकर महाराज शासनाच्याविरोधात वक्तव्य करत होते. मी लस घेतली नाही, घेणार नाही आणि मला करोना झाला नाही. तो त्यावेळेस आपत्तीसंदर्भातील कायदा होता त्याविरोधात त्यांनी वक्तव्य केलं,” अशी आठवण गवांदे यांनी करुन दिलीय. तसेच सध्याच्या प्रकरणाबद्दल बोताना, “आता सुद्धा दिव्यांगांबद्दलचं जे वक्तव्य केलंय ते भावना दुखावणारं आणि समाजात अंधश्रद्धा पसरवणारं वक्तव्य आहे,” असं गवांदे म्हणाल्या. “म्हणजे मी शाप दिला तर असं घडेल अशाप्रकारचं त्यांचं हे वक्तव्य आहे. या वक्तव्याच्या संबंधाने चौकशी होऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे,” असं गवांदेंनी म्हटलंय.

निवृत्ती महाराज नेमकं काय म्हणालेले?
अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी सात मार्च २०२२ रोजी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाजारांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. इंदुरीकर महाराजांनी या किर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावला. “चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार. यांचं चांगलं होणार नाही,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले. इतकच नाही तर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

या किर्तनादरम्यान त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकलं. व्हिडीओ काढू नका असं त्यांनी अनेकदा सांगितलं. संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.

यापूर्वीही केलीय अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं
इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरुन वादात अडकले आहेत. २०२० साली एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली.

करोनाबद्दलही केलेलं वक्तव्य
याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमधील घोटी येथील कार्यक्रमादरम्यान करोनासंदर्भात वक्तव्य करताना आपण लस घेतली नाही आणि घेणार ही नाही असं म्हटलं होतं. “मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं. 

तिसऱ्या लाटेबद्दलचं वक्तव्यही वादात…
तसेच याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंदुरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात माळा काढणाऱ्यांसाठीच करोनाची तिसरी लाट आहे असं म्हटलं होतं. यावरुनही बराच वाद झाला होता. “दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार,” असं इंदुरीकर म्हणालेले.