राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन ११ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळालेला आहे. तर आता या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अंतिम सामान्यास फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते मानाचा किताब प्रदान केला जाणार आहे. अशी माहिती संयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

‘ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठीचे आमंत्रण दिले. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्याच हस्ते मानाचा किताब प्रदान केला जाणार आहे. यावेळी समवेत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ अध्यक्ष पै. संदीप भोंडवे आणि राष्ट्रीय तालीम संघ पुणे अध्यक्ष हिंदकेसरी पै.योगेश दोडके उपस्थित होते.’ असं मोहोळ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…

या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या अगोदर दिलेली आहे.

नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.