Deputy Chief Minister Explain by Ulhas Bapat : २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या काळात राज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर, २०२२ मध्ये राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यामुळे अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद जाऊन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. वर्षभराने २०२३ मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून तेही सत्तेत सामील झाले. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री पदे मिळाली. पण हे उपमुख्यमंत्री पदच घटनात्मक नसल्याचं घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट म्हणाले. ते झी २४ तासशी बोलत होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार, राज्यात नव्या सत्तासमीकरणात भाजपाचा मुख्यमंत्री आणि दोन पक्षाचे प्रत्येकी एक एक उपमुख्यमंत्री असणार आहेत. म्हणजेच, मागच्या टर्मप्रमाणे यंदाही दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. पण हे उपमुख्यमंत्री पदच वैधानिक नसल्याचं प्रा. उल्हास बापट म्हणाले आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती

उल्हास बापट म्हणाले, “केंद्रात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं. राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असतं. उपमुख्यमंत्री असं पद राज्यघटनेत लिहिलेलं नाही. राज्याच्या १६४ कलमानुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. तर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात.”

हेही वाचा >> एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट! ताप, सर्दी अन् घशाचा संसर्ग, सलाईनही लावली; डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती!

उपमुख्यमंत्री पद नावापुरतंच!

“केंद्रात ७५ कलमाखाली राष्ट्रपती पंतप्रधांनांची नियुक्ती करतात तर, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती होते. चार प्रकारचे मंत्रि‍पदे असतात. मुख्यमंत्री पद हा पहिला प्रकार. तर, दुसऱ्या प्रकारात कॅबिनेट मंत्री असतात. त्यातच गृह, अर्थ अन् उपमुख्यमंत्री असतात. ते वेगळं पद नसतं. ते नावापुरतंच असतं. त्याला राज्यघटनेत काही अर्थ नाही”,असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा >> Ajit Pawar : महायुतीचं ठरलं! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

५ डिसेंबरला होणार शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

Story img Loader