scorecardresearch

सांगली : राज्य गुप्तचर विभागाच्या उपअधीक्षक आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या

थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये राज्य गुप्तचर विभागामध्ये सांगली कार्यालयामध्ये उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या.

सांगली : राज्य गुप्तचर विभागाच्या उपअधीक्षक आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या
राज्य गुप्तचर उपअधीक्षक आरिफा मुल्ला ग्लॅमन

थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये राज्य गुप्तचर विभागामध्ये सांगली कार्यालयामध्ये उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आरिफा मुल्ला ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या. याशिवाय त्या स्पर्धेतील उत्कृष्ट व्यक्तिमत्व गटामध्येही उपविजेत्या ठरल्या.थायलंड मधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती .

१६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. झालेल्या स्पर्धेत सांगली सीआयडी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सौ. आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या ग्लॅमन मिसेस इंडिया ठरल्या. मुल्ला यांनी या स्पर्धेसाठी पुणे येथे चाचणी दिली होती. फिल्मफेअर मिडल इस्ट च्या ग्लॅमन या कंपनी तर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deputy superintendent of state intelligence arifa mulla glaman winner of mrs india amy

ताज्या बातम्या