दिशा सालियन प्रकरणावरून आज विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्ष असा आरोप प्रत्यारोपांचा सामना पहायला मिळाला. आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न भाजपा आणि शिंदे गटाने केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. त्यावर विरोधी पक्ष नेते आजित पवार यांनी आपली बाजू मांडताना दिशाच्या आई-वडीलांपासून ते अगदी पूजा चव्हाण प्रकरणापर्यंतचा संदर्भ दिला.

अजित पवारांनी मांडली सविस्तर भूमिका

दिशा सालियन प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहामध्ये मोठी घोषणा केली आहे. “दिशा सालियन प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल,” असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर अजित पवार यांनी यासंदर्भातील भूमिका मांडताना आपणही देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री होतो अशी आठवण करुन देत या प्रकरणावरुन राजकारण केलं जात असल्याच्या संदर्भातून टीका केली. तसेच दिशाच्या आई वडिलांनी केलेली संपूर्ण मागणीच अजित पवार यांनी वाचून दाखवली. इतकच नाही तर अजित पवारांनी शिंदे गटातील आमदार आणि विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशीही केली पाहिजे असंही म्हटलं.

hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता

दिशाच्या आई-वडीलांचा दिला संदर्भ

“आपल्या एखाद्या संस्थेबद्दल शंका येते तेव्हा आपण केंद्रीय संस्थांकडे प्रकरणं पाठवतो. किंवा चौकशी करणाऱ्या केंद्रीय संस्थांकडे प्रकरणं पाठवली जातात. अशाप्रकारचे आदेश उच्च न्यायालय देऊ शकतं. तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल काय झालं, बोललं गेलं हे मी सगळं इथं बोलणार नाही. आज ती हयात नसताना तिच्याबद्दल बोलणार नाही. ती आपली मुलगी, बहीण असल्यासारखं आहे. म्हणूनच मी याबद्दल बोलून तिला बदनाम करण्याचं कारण नाही,” असं अजित पवार दिशा सालियनबद्दल म्हणाले. तसेच पुढे, “तिच्या आई-वडिलांनी हात जोडून विनंती केली. मधल्या काळात राजकीय लोकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिकेसंदर्भात दिशाचा उल्लेख केला. तो केल्यानंतर तुमच्या पण वाचनात आलं असेल की राजकारणाचा आम्हाला खूप त्रास होतोय. हे मी नाही दिशाचे आई-वडील म्हणत आहेत,” असं अजित पवार यांनी दिशाच्या आई-वडीलांनी जारी केलेलं पत्रक वाचून दाखवताना म्हटलं.

नक्की वाचा >> आरोग्यमंत्र्यांना ‘ओमिक्रॉन’चं नावही घेता येईना! पत्रकारांनी प्रश्न विचारला असता डोकं खाजवत म्हणाले, “आपला जो ‘एमिक्रॉन’…”

…हे दिशाच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे

“आम्हाला जगू दिलं जात नाही. आम्हाला त्रास देऊ नका. आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती आम्हाला सोडून गेली. यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे. असा सवाल दिशाच्या आई-वडीलांनी केला आहे. जे दावे केले जात आहेत ते चुकीचे आहेत. माझ्या मुलीला बदनाम केलं जातं. सर्व सत्य माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. बदनामी होत राहीली तर आम्ही जगणार नाही. आम्ही जिवाचं बरं वाईट केलं तर त्यासाठी जे जे मुद्दे उपस्थित करतात ते नेते किंवा संबंधित सहकारी जबाबदार राहतील. मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की कुणालाही बदनाम करु नका हे दिशाच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे. हे सगळीकडे छापून आलेलं आहे,” असं अजित पवार म्हणाले.

स्वत:च्या पोटचा जीव गमावल्यानंतर…

“त्या राष्ट्रपती मोहोदयांनाही भेटल्या. एखादे आई-वडील पोटतिकडीने सांगत आहेत. स्वत:च्या पोटचा जीव गमावल्यानंतर सांगत आहेत. तिने आत्महत्या केली हे सीबीआयकडून आलेलं आहे,” असं अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं. तसेच पुढे अजित पवार यांनी थेट चौकशी करायची ठरलं तर सगळ्याच प्रकरणाची करावी लागेल असं म्हणत पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केला.

नक्की वाचा >> “काही लोकांना वाटलं पटापट विकेट पडतील पण मला…”; बंडखोरीची आठवण काढत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पूजा चव्हाण प्रकरणाचा केला उल्लेख

“ही चर्चा करत असताना सत्ताधारी पक्षाने आज आमची खूप महत्त्वाची कामं, विषय आहेत. त्यासंदर्भात कुणी काढलं तर मग पूजा चव्हाण प्रकरणासंदर्भातही चौकशी करा,” असं आजित पवार म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर, “जसे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसा मी होतो. आम्हाला पण काही थोडा अधिकार होता. आम्ही पण सांगत होतो की याची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळेस हेच मान्यवर विरोधी पक्षामध्ये होते. त्या त्यावेळी कशापद्धतीने सभागृह बंद पाडण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा कार्यक्रम झाला हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं,” असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना पूजा चव्हाण प्रकरणाची आठवण करुन दिली. “चौकशा करायच्या असल्या तर सगळ्यांच्याच चौकशा कराव्या लागतील. चौकशी बंद झाली असली तरी रिओपन करता येते,” असं म्हणत अजित पवारांनी भाजपा आणि शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

त्या इच्छेचा आपण सन्मान करुयात

आपली भूमिका मांडताना शेवटच्या ओळीमध्ये अजित पवारांनी, “महाराष्ट्रातील जनतेला सत्य कळलं पाहिजे. पण कृपा करुन यामध्ये राजकारण करु नका. तिच्या आई-वडीलांची ही इच्छा आहे. त्या इच्छेचा आपण सन्मान करुयात,” असं म्हटलं.