उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया’ आघाडीवर सडकून टीका केली आहे. आपली लढाई कुणाशी आहे, हे लक्षात घ्या. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आपल्याशी लढा देऊ शकत नाही. कारण, राहुल गांधी आणि काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
राज्यातील भाजपा पदाधिकारी आणि जिल्ह्याध्यक्षांना देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव नेतृत्व करू शकत नाहीत, हे लोकांच्या मनात पक्क आहे. निवडणुकीपूर्वीच ही लोक भांडत आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारमध्ये काँग्रेसने निवडणूक लढू नये, असं मित्रपक्षांनी सांगितलं आहे.”




हेही वाचा : VIDEO : “राज्यात सरकार तीन पक्षांचं असलं, तरी भाजपा हा…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
“कुणीही एका राज्याच्या बाहेर नेते नाहीत”
“हे निवडणुकीपूर्वीच एकत्र राहू शकत नाहीत. तर, निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा संबध येतच नाही. यांच्यात कुणीही राष्ट्रीय नेता नाही. पंतप्रधान मोदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही जिल्ह्यात गेल्यावर तेवढेच लोक स्वागताला आणि सभेला असतात. पण, इंडिया आघाडीतील एकही जण दुसऱ्याला मत देऊ शकत नाहीत. कुणीही एका राज्याच्या बाहेर नेते नाहीत,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.
हेही वाचा : “एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची”; फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
“घरगुती दुकानं बंद होतील, म्हणून एकत्र”
“इंडिया आघाडीचा मोदींना विरोध करणं हाच संकल्प आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून आले, तर आपली घरगुती दुकानं बंद होतील, म्हणून हे सर्व एकत्र आले आहेत,” असं टीकास्र फडणवीसांनी सोडलं आहे.