scorecardresearch

VIDEO: “भाजपात असा किंवा कुठेही असा, ज्याने चूक केली त्याची…”; देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारलं असात त्यावर प्रतिक्रिया दिली आहे,

Devendra Fadnavis 13
देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र सौजन्य – आरएनओ)

देशातील ९ विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रिय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याची तक्रार केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (५ मार्च) अमरावतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. मोदींच्या राज्यात ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत, गैरकारभार-भ्रष्टाचार करत आहेत अशांना शिक्षा देण्याचं काम या यंत्रणा करत आहेत. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही.”

“पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होणार नाही”

“त्यामुळे असं कोणतंही पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होईल, असं मला वाटत नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हा भ्रष्टाचार त्यांनी बंद करावा,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “अजित पवारांनी सकाळी साखर झोपेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा…”, अधिवेशनात एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या का?

भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या या विरोधकांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले, “आरोप करणाऱ्यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या असं एखादं उदाहरण दाखवावं. कुणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपात असा किंवा कुठेही असा, ज्याने चूक केली त्याची चौकशी होईल. एखाद्यावर चुकीची कारवाई झाली असेल, तर न्यायालय आहे.न्यायालय निश्चितपणे न्याय देईल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 17:08 IST