Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे, त्यामुळेच…”; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray?
उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका.” असा सल्ला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Ajit Pawar On Amit Shah Statement
Ajit Pawar : अमित शाहांच्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “राज्यात एका पक्षाचं सरकार सत्तेत…”
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray Meeting Claims VBA
Politics : “देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि..”, वंचित बहुजन आघाडीचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
Jaydeep Apte bail, Shivaji Maharaj statue Malvan,
सिंधुदुर्ग : मालवण येथील शिव पुतळा शिल्पकार जयदीप आपटे याचा जामीन अर्ज नामंजूर
Sushilkumar shinde and Sharad Pawar Akluj solapur speech
Sharad Pawar: “मी थोरला, माझ्या नादी लागू नका…”, शरद पवारांची सुशीलकुमार शिंदेंना तंबी

राज्यातील ३ कोटीपेक्षा जास्त लोक सरकारी योजनांचे लाभार्थी

राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक हे सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत. सरकारने जी कामं केली त्यामुळे लोक आपल्याबरोबर आहेत. या सगळ्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंचा जनाधार संपल्याचीही टीका केली.

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला

“उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. मराठी आणि हिंदू मतं त्यांच्या बरोबर नाहीत. राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका.” असंही आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केलं. Tv ९ मराठीने हे वृत्त दिलं आहे.

अमित शाह यांचं भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाचा इतिहास आणि निस्पृह वृत्तीविषयी सांगितले. एक काळ असा होता की लोकसभेत आपल्या फक्त दोन जागा होत्या, त्यावेळीही आपला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. हा आपला इतिहास आहे, असं अमित शाह म्हणाले. ऐंशीच्या दशकातील कार्यकर्त्यांना माहिती असायचे, आपण निवडणूक हरणार आहोत, तरीही काळजी नव्हती. आपण राजकारणात महान भारताच्या रचनेसाठी आलो आहोत, पंतप्रधान किंवा कुठल्याही पदासाठी नव्हे. सरकार येते व जाते, पक्ष निती व विचार सोडतात, आपले सरकार १० वर्षे चालले पण आपण विचार किंवा निती सोडली नाही.

काश्मीर आपला आहे हे, विरोधात असतानाही आपण बोलत होतो. तेव्हा आपले सरकार येईल असे कुणाला वाटले होते का? पण आपले सरकार आले व कलम ३७० आपण हटवले. राम मंदिर होईल असे कुणाला वाटले होते का? पण भूमिपूजन नव्हे तर मंदिर पण तयार केले. आज ‘जय श्रीराम’ हक्काने म्हणत आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis criticized uddhav thackeray said this thing about him scj

First published on: 01-10-2024 at 18:34 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या