केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी दरात कपात केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारनेदेखील इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली़. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्ष म्हणजेच भाजपने आक्षेप घेतला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन करकपात म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचे म्हणत पेट्रोल, डिझेलचे भाव केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कमी झाले आहेत, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >>> अहमदनगर: पुणतांबा गावातील शेतकरी पुन्हा आक्रमक; ग्रामसभेत १६ ठराव मंजूर

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
Devendra Fadnavis
सागरी सुरक्षेच्या कामासाठीही ९५ पदांची कंत्राटी भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाचा शासन आदेश
Semiconductor project
सेमीकंडक्टर चिपच्या १.२६ लाख कोटींच्या ३ प्रकल्पांना मोदी सरकारची मंजुरी; ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये

“महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही. तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

हेही वाचा >>> Video: “गां** दम असेल तर…”; भाजपावर टीका करताना प्रकाश आंबेडकरांचं आक्षेपार्ह विधान

तसेच, “महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला. महाराष्ट्रात पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये जे कमी झाले. ते रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचेसुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.” असे अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा >>> औरंगाबादेत पती-पत्नीचा गळा चिरून खून, मृतदेह सडून परिसरात दुर्गंध आल्यानंतर घटना उघड

तसेच “इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रिकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो,” असंही फडणवीस यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

हेही वाचा >>> “ज्याला हाताची भाषा कळते त्याला हाताची भाषाच दाखवावी लागते”; शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांचं वक्तव्य

दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ८ रुपये तर डिझेलवरील करात सहा रुपये कपात शनिवारी केली होती. त्यानंतर राज्य सरकारांनीही मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने इंधनावरील करकपातीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर सुमारे २५०० कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे.