scorecardresearch

Premium

“त्यांच्यावर बोलणे म्हणजे आपल्याच तोंडाची वाफ गमावणे” राऊतांच्या सत्तांतराच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका

राऊतांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

devendra fadnavis and sanjay raut
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत (संग्रहित फोटो)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. भविष्यात सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असे मोठे वक्तव्य केले. राऊतांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचीच सत्ता येईल असे म्हणणारे भाबडे आहेत. त्यांच्यावर बोलणे म्हणते तोंडाची वाफ घालवणे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >> औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी नवे समीकरण, शिंदे गट-भाजपा यांच्यात युती तर उद्धव ठाकरे समर्थकांनीही घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar vs Rohit Pawar
“आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!”, रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
rohit pawar on devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू”, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…
Ved Prakash Arya criticizes BJP
अपयश झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची शरद पवारांवर टीका, राष्ट्रवादीचे प्रतिउत्तर
maharashtra agriculture minister dhananjay munde praise union minister nitin gadkari in event at akola
अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

“आमचीच सत्ता येईल असे म्हणणारे नेते खूप भाबडे आहेत. ते दिवसातून कितीतरी वेळा काय काय बोलतात. त्यांच्यावर बोलणे म्हणजे आपल्या तोंडाची वाफ दवडणे आहे. त्यामुळे कृपया त्याच्यावर मला विचारू नका. याबाबतचे प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या छोट्या प्रवक्त्यांना विचारा. ३२ दिवस पाच लोकांचं ज्यांनी सरकार चालवलं त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही,” ” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांचे नाव न घेता लगावला. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आम्ही कोणतेही काम अटकू देणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा >> “धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”

संजय राऊत काय म्हणाले?

“सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis criticizes sanjay raut on commenting fall of eknath shinde devendra fadnavis government prd

First published on: 28-07-2022 at 17:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×