scorecardresearch

“देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?; अमृता फडणवीसांवरील टीकेवरुन चंद्रकात पाटलांचे उत्तर

मोदींकडून काही शिकले पाहिजे की नाही असे अमृता फडणवीस म्हणातत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?; अमृता फडणवीसांवरील टीकेवरुन चंद्रकात पाटलांचे उत्तर
नवाब मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही व्यक्ती जयदीप राणा असल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले. तसेच फडणवीस आणि राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांना उत्तर दिले आहे.

“हे चार पक्षांमधले प्रकरण आहे. एकत्र बसून यामधली आचारसंहिता ठरवली पाहिजे. तुम्ही सकाळी बेछूट आरोप करायचे. आम्ही संयम बाळगलाय पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे या संजय राऊतांच्या वक्तव्यावर लोक हसतील. सरकारमध्ये असताना बाहेर पडण्याची त्यांची हिंम्मत नव्हती. कोरे कागद खिशामध्ये ठेवले होते. त्यामुळे भाजपाने सुरुवात केली या संजय राऊतांच्या वक्तव्यावर आठवीतला मुलगा हसेल. रोज उठून मोदींना चौकीदार चोर हे म्हणायचे. आई वडिलांपेक्षा सुद्धा श्रद्धा आहे आमची मोदींवर आहे. गप्प नाही बसणार,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का? रोज उठून अमृता फडणवीसांवर आरोप करत आहात. त्यांनी किती संयम बाळगायचा? आमच्याकडून राऊत किंवा पवार साहेबांच्या कुटुंबियांवर कोणी बोलले नाही.  दरवेळी तुम्हाला बोलण्यासाठी अमृता फडणवीसांचे नाव का लागते? त्या शांत राहतात त्यामुळे आम्हाला वाईट वाटते. तुम्ही शांत का बसता असे विचारल्यावर त्या ठीक आहे, मोदींकडून काही शिकले पाहिजे की नाही असे म्हणतात. मोदी कधी बोलत नाही, पत्रकार परिषद घेत नाही. शांतपणे काम करत असतात,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले. यामध्ये त्यांनी केवळ दोन ओळीचं ट्वीट करत मलिकांना लक्ष्य केले. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते! असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या