पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत फडणवीसांनी गंभीर इशारा दिला. ते शनिवारी (२४ सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू.”

यावेळी फडणवीसांनी एनआयएने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं. ते म्हणाले, “पीएफआयवर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की, यासंदर्भातील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पुरावे एनआयएकडे, एटीएसकडे आणि केंद्र व राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळसारख्या सरकारने पीएफआयवर बंदी टाकण्याची मागणी केली आहे. सध्या तपास सुरू आहे. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील.”

हेही वाचा : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video

“पीएफआयच्या नव्या कार्यपद्धतीनुसार (मोडस ऑपरेंडी) देशात आतल्या आत अस्वस्थता निर्माण करण्याचं षडयंत्र आखलं जात होतं. या सर्व गोष्टी योग्यवेळी बाहेर येतील,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis first reaction on slogans of pakistan jindabad in pune pbs
First published on: 24-09-2022 at 18:47 IST